मेट्रोच्या कामासाठी खोदकाम करताना निगडित पुन्हा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

मेट्रोच्या कामासाठी खोदकाम करताना निगडित पुन्हा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

(स्त्रीशक्ती)

मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांच् विरोधात गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

निगडी ते पिंपरी मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोर्टलंड मशीन ने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत आहेत 

त्या ठिकाणी पुन्हा पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. भक्ती शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावर( आज दिनांक १९ )संध्याकाळी ६:०० वजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेऊन मेट्रो प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा,अन्यथा रस्ता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे शहर चटणी सचिन काळभोर यांनी दिला आहे. निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावर आज पुन्हा पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे यापूर्वी सुद्धा मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यावर पोर्टलंड मशीनने रस्त्यावर खडी खोदण्यात येत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेची पाणीपुरवठा कारवाई पाईपलाईन फुटन हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

सध्या उन्हाळा सुरू असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन हातबोल झालं दुसरीकडे तीन वेळा मेट्रोचे काम सुरू असलेल्या निगडी भागात काम करणाऱ्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे वारंवार असे प्रकार घडून सुद्धा संबंधित ठेकेदाराविरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह कारवाई करत नाहीत मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याप्रकरणी दखल घेऊन तात्काळ निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा.अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप शहर चटणी सचिन काळभोर यांनी दिला आहे