पुणे जिल्ह्यात ३ नवीन महापालिका होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली मोठी घोषणा
पिंपरी चिंचवड: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (8 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली.
पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असती. याचं चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं.
त्यामुळं या चौकातील कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. यावेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.अजित पवारांकडून चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडीची पाहणी
आयटी पार्क हिंजवडी पाठोपाठ चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय.
चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. अजित पवार यांनी आज भल्या पहाटे पुणे- नाशिक महामार्गावरील भोसरी विधानसभा क्षेत्रातील भारत माता चौक या ठिकाणी वाहतूक कोंडीची पाहणी केली.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी हजर होते. या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी 'नक्शा' पाहणी करून वाहतूक कोंडीला अडसर ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.




Comments (0)
Facebook Comments (0)