बाबा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.नगरसेवक राहुल भोसलेचे गौरवपुष्प!
स्त्रीशक्ती न्यूज
पिंपरी चिंचवड शहरात कष्टकरी जनता आघाडी आणि ऑटो–टॅक्सी फेडरेशनच्या वतीने “खेळ रंगला पैठणीचा” हा भव्य सांस्कृतिक सोहळा पिंपरी चौक, खराळवाडी येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विशेष ठरला तो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कष्टकरी जनतेचे नेतृत्व करणारे डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त.
या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. कांबळे स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि संपूर्ण परिसरात स्वागताच्या घोषणा घुमत राहिल्या. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पैठणी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरेचा सोहळा यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा शाल–श्रीफळ आणि पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कष्टकरी जनतेसाठी सातत्याने करत असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव करत आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कष्टकरी, ऑटो-टॅक्सी चालक, महिला आणि श्रमिक वर्गासाठी लढणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन केला हा सन्मान अतिशय भावनिक ठरला.
या सोबतच कार्यक्रमात नगरसेवक राहुल भोसले यांचाही विशेष मानाने सत्कार करण्यात आला. डॉ. कांबळे यांच्यासमक्ष आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यात भोसले यांना शाल, पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. “हा सन्मान म्हणजे जनतेचा विश्वास आहे. कष्टकरी वर्गासाठी पुढेही प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मा. नगरसेवक व माजी सभापती स्थायी समिती – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री. अजितभाऊ गव्हाणे यांनी विशेष उपस्थिती नोंदवली. तर माजी नगरसेवक यांनी देखील मनोगत व्यक्त करत “कष्टकरी जनता आघाडी व ऑटो-टॅक्सी फेडरेशन समाजातील तळागाळातील लोकांसाठी सातत्याने काम करत आहे. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक वारसा आणि जनसेवा अधिक मजबूत होते,” असे सांगितले.
कार्यक्रमात महिलांसाठी आयोजित पैठणी स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, समाजजागृतीपर उपक्रम आणि नागरिकांसोबतचा संवाद यामुळे कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.
डॉ. कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ उत्सव नव्हे तर सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि जनतेच्या अपेक्षांना दिशा देणारा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.




Comments (0)
Facebook Comments (0)